मोफत आरोग्य शिबीरातून ६१७ रुग्णांनी घेतला उपचाराचा लाभभूम रिपोर्टर     

     मोफत आरोग्य शिबीर आयोजित करून रुग्णांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मल्हार दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ . नवी मुंबईच्यावतीने      मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर ग्रामीण रुग्णालय भूम येथे घेण्यात आले .

    गुरूवार दिं २३ जून २०२२ रोजी भूम ग्रामीण रुग्णालय येथे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर नेरूळ . नवी मुंबईच्यावतीने व भूम शहर भाजपच्या पुढाकाराने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर घेण्यात आले .  या शिबीराचे उघाटन भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले .

      यावेळी ग्रामीण रुग्णालय अधिकारी डॉ विजयकुमार सुळ . डॉ अमोल कुटे . मुंबई येथिल त्वचारोग तज्ञ डॉ केटकी संखे . स्त्रीरोग तज्ञ डॉ मानसी मनवीर .  बालरोग तज्ञ डॉ राज मोहिल . सर्जरी तज्ञ डॉ सुमेर शेख . निशिकांत लोकरे . अमर चव्हाण . महेश तेरकर . भाजप तालुका अध्यक्ष महादेव वडेकर . जिल्हा सरचिटणीस आदम शेख . तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर . भूम शहर अध्यक्ष शंकर खामकर ता. युवा अध्यक्ष श्भाऊसाहेब कुटे . ता. उपाध्यक्ष बाबासाहेब विर . शहर सरचिटणीस हेमंत देशमुख . ता. युवा सरचिटणीस सचिन मस्के .  संतोष ओताडे .  बप्पा बोराडे . अत्पसंख्याक शहराध्यक्ष  प्रदिप साठे  व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

      या शिबीरांमध्ये हृदयरोग . स्त्रीरोग . बालरोग . किडनीचे आजार .  मुतखडा . त्वचारोग . पोटाचे विकार या आजाराची मोफत तपासणी करून मोफत औषध उपचार केला आहे . मोफत आरोग्य निदान व उपचार ' शिबीर तालुक्यात अंभि. डोकेवाडी . वालवड . येथे घेण्यात आले . तेथे अंभि - ५१ . डोकेवाडी - २९१ .. वालवड - ९१ तर भूम येथे २६८ रुग्णांनी मोफत तपासणी व उपचार शिबीराचा लाभ घेतला . यातील भूम येथून ४२ रुग्न पुढील उपचारासाठी रेफर केले आहेत . चार ठिकाणच्या शिबीरातून तब्बल ६१७ रुग्णांनी लाभ घेतला .  आणखी ईट . माणकेश्वर . पाथरूड . सुकटा येथे शिबीर  घेण्यात येणार आहे .     

      भूम येथिल ' शिबीराच्या यशस्वीतेसाठी संतोष सुपेकर . भूम शहर अध्यक्ष शंकर खामकर . ता. उपाध्यक्ष बाबासाहेब विर. हेमंत देशमुख .  सचिन मस्के .  संतोष ओताडे .  प्रदिप साठे यांनी परिश्रम घेतले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या