बेंबळी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त सत्तार शेख यांच्या वतीने थंड पेय वाटपरिपोर्टर ..बेंबळी : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शनिवारी ३० एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवेळी मुस्लिम बांधवांनी थंड शरबतची व्यवस्था केली होती. पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्तार शेख यांच्या वतीने हा उपक्रम करण्यात आला. आझाद चौकातील मोबाईल केअर येथे ही व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीत सहभागी सर्वांनी या थंडगार शरबतचा लाभ घेतला.


 यावेळी माजी जयंती समारोह समितीचे अध्यक्ष माजी उपसरपंच बाळासाहेब माने,युवा नेते सलमान भाई, उपाध्यक्ष बालाजी माने,राजाभाऊ नळेगावकर ग्रा प सदस्य, जिदाशहा फकीर, असिफ पठाण, गफार शेख, शेखअली रोडे, हरेश सय्यद, पाशा शेख, महेश पाटील, पद्माकर निकम, तुकाराम राऊत, अजमेर शेख, सद्दाम शेख,अशपाक शेख, खलील शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या