उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचा डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्याकडून सत्कार

 
उस्मानाबाद:रिपोर्टर 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दरम्यान धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी त्यांचा सत्कार करत त्यांना  'विचार सूत्रे' हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावरील पुस्तक भेट दिले. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार,पक्ष निरीक्षक रमेश बारस्कर, राष्ट्रवादी लीगल सेलचे उस्मानाबाद शहराध्यक्ष योगेश सोन्ने पाटील, अमोल सुरवसे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या