ईनामी जमीन प्रकरणी नायब तहसिलदार वाबळे यांच्या चौकशीचे आदेश -तालूक्यातील ईनामी जमीनीचे बेकायदा फेरफार रद्द होणार

  





परंडा रिपोर्टर सुरेश बागडे 


परंडा तालूक्यातील खासगाव येथिल ईनामी जमीन विक्रिसाठी  बेकायदा परवाना दिल्या प्रकरणी तत्कालीन तहसिलदार सुजित वाबळे यांची सखोल चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा असा आदेश उप जिल्हाधिकारी अधिनाश कोरडे यांनी भुम च्या उप विभागीय आधिकारी यांना दिला आहे .


सुजित वाबळे हे सध्या परंडा तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार पदावर  कार्यरत असुन तहसिलदार पद रिक्त असल्याने त्यांच्या कडे तहसिलदार पदाचा पदभार देन्यात आला होता.


या काळात तत्कालीन प्रभारी तहसिलदार वाबळे यांनी खासगाव येथील ईनामी जमीन गट नंबर ५१ व ५४ मधील ८० आर जमीन खरेदी विक्री करन्यास पदाचा दुरुपयोग करून  दि २० ऑगष्ट २०२१ रोजी शासणाचा नजराना भरून न घेता  बेकायदेशीर ना हरकत प्रमाण पत्र दिल्याचा आरोप करन्यात आला होता 


बाबळे यांनी दिलेल्या  नाहरकत प्रमाण पत्रा मुळे खासगाव येथिल ईनामी जमिनीची खरेदी विक्री व्यवहार झाला होता .


या प्रकरणी दिपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा सरचिटणीस उमेश सोनवणे यांनी  जिल्हाधिकारी  यांच्या कडे १२ एप्रील रोजी निवेदन देऊन खासगाव येथील ईनामी जमीन  खरेदी साठी पदाचा दुरुपयोग करून शासनाचा नजराना भरून न घेता  बेकायदा नाहरकत प्रमाण पत्र दिल्या प्रकरणी  चौकशी करून तत्कालीन प्रभारी तहसिलदार सुजित वाबळे यांना निलंबीत करावे अशी मागणी करन्यात आली होती .


या प्रकरणाची दखल घेऊन सखोल चौकशीचे करून अहवाल सादर करन्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे .


तसेच जिल्हयातील ईमामी जमीनीची    बेकायदा  हस्तांतर होत असल्याने  जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन  उस्मानाबाद जिल्हयातील ईनामी , कुळ , सिलींग , इत्यादी जमीनी साठी लागू नसलेले परिपत्रक वापरून अवैध सत्ता प्रकार बदल करून परवानगी देने सारखे प्रकार झाल्याचे निदर्शनास आल्याने परंडा सह जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांना दि १९ मे  २०२२ रोजी पत्र देऊन ईनामी जमिनी बाबत कोणत्याही सक्षम अधिकारी यांचे पुर्व परवानगी शिवाय झालेले हस्तांतर , फेरबदल , अदलाबदल , फेरफार नोंद सत्ता प्रकार बदल अश्या प्रकरणाचा शोध घेऊन सविस्तर अहवाल सादर करावा व शर्तभंग झाला असल्यास फेरफार रद्द करन्यासाठी उप विभागीय आधिकारी यांच्याकडे  सादर करावा व शर्तभंगाची कारवाई करावी ज्या मुळे शासनाचे महसलचे नुकसान होणार नाही . असे पत्रात आदेशीत करन्यात आले आहे .


जिल्हाधिकारी यांच्या कारवाई मुळे परंडा तालूक्यातील ईमामी जमीनीची बेकायदेशीर झालेले खरेदी -विक्रीतील अनेक  व्यावहार उघड होण्याची शक्यता असल्याने खळबळ उडाली आहे .


जिल्हा आधिकारी यांच्या आदेशा नुसार  परंडा येथे महसल विभागाची बैठक घेऊन ईनामी जमीनीची बेकायदा हस्तांतर प्रकरणे तपासणी चे आदेश देन्यात आले आहे 


उप विभागीय आधिकारी हे खासगाव येथिल ईनामी जमीन प्रकरणी तत्कालीन तहसिलदार वाबळे यांची चौकशी करनार असून वाबळे यंच्यावर काय कारवाई  होते या कडे तालूक्याचे लक्ष लागले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या