ग्राहकांनी व्यापाऱ्यांना टाळून थेट शेतकऱ्यांकडून मालक खरेदी करावा: बाळासाहेब पाटील
भूम:रिपोर्टर 

      शेतकऱ्यांच्या मालावर व्यापारी श्रीमंत झाला.यात ग्राहकांना महागड्या दराने माल खरेदी करावा लागला.शेतकरी जगला पाहिजे.शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे यासाठी ग्राहकाने थेट शेतकऱ्याकडूनच माल खरेदी करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या सत्कारात बोलताना केले.

     रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजी मिनी पर्णकुटी असलेल्या हाडोंगरी शिवारात प्रशस्त थंडगार हवेच्या ठिकाणी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी सौ प्रभावती रेवणसिद्ध लामतुरे व रेवणसिद्ध लामतुरे या पती-पत्नींचा सत्कार करण्यात आला. 

      या कार्यक्रमा दरम्यान सधन शेतकरी . प्रगतशील शेतकरी . उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे यांनी आधुनिक शेती ही विषमुक्त करावी. अधिकाधिक उत्पन्न हे विषमुक्त घेण्याचा प्रयत्न करावा. यासाठी मजूर मिळत नसेल तर निश्चितपणे आधुनिक यंत्राचा वापर करावा गरजेनुसार यंत्र तयार करून घ्यावी असेही आवाहन केले.     

      यावेळी   जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर  यांनी  आज घडीला शेतकरी उत्पन्न घेतो. शेतकरी १०० रुपयांचा माल  विकत असेल तर तो माल व्यापारी १०० रुपयांमध्ये घेऊन ३०० रुपयेला विकतो . यामध्ये कष्ट न करता व्यापारी २०० रुपये अधिक मिळवतो म्हणजे इथे मध्यस्थांना अधिक मेवा मिळतो . शिवाय ग्राहकांना देखील महागड्या भावात माल खरेदी करावा लागतो . यासाठी ग्राहकांनी थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माल खरेदी करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.

    यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ रामहरी मोटे.माजी तालुका कृषी अधिकारी विक्रम गाढवे.पोलिस निरीक्षक दत्तात्रय सूर्यवंशी.अमेय पाटील . आदित्य पाटीलसह परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती.सुत्रसंचलन सुखदेव पालकर सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या