आंजनसोंडा येथे चोरी:जनावरासह रक्कम लंपास
रिपोर्टर 

घरासमोर बांधलेले गाय,वासरू आणि घरामध्ये ठेवलेली रोख रक्कम घेवून चोरटे पसार झाले असल्याची घटना आंजनसोंडा गावातील प्रदिप मोटे यांच्या राहत्या घरी दि.1 मे रोजी पाहाटच्या सुमारास घडली आहे.सदर घटनेची नोंद वाशी पोलीस स्टेशनमध्ये केली असुन पुढील तपास सुरू आहे.

भूम तालुक्यातील आंजनसोंडा गावामध्ये गावालगत असलेल्या प्रदिप मोटे यांच्या घरी पाहाटे 4 च्या सुमारास चोरी झाली असुन त्यामध्ये घरासमोर बांधलेले गाय,वासरू आणि घरामध्ये स्टीलच्या डब्ब्यात कांदयाची पटटी आलेले 53000 हजार रूपये अज्ञात व्यक्तीने चोरून नेहले आहेत.सदर प्रकरणाची तक्रार वाशी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली असुन पुढील तपास सुरू असल्याचे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या