भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती भाजपा कार्यालयात साजरी

उस्मानाबाद रिपोर्टर 


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंती  प्रतिष्ठाण भवन भाजपा कार्यालय धाराशिव येथे साजरी करण्यात आली. तसेच शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भाजपाचे आ.राणाजगजितसिंह पाटील आणि भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते हार घालुन अभिवादन करण्यात आले. व याप्रसंगी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमास भाजपाचे दत्ताभाऊ कुलकर्णी, ॲड.खंडेराव चौरे, सतिष देशमुख, सुनिल काकडे, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, प्रविण सिरसाठे, बालाजी कारे, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, संदिप इंगळे, नरेंद्र वाघमारे, उदय देशमुख, मेसा जानराव, लक्ष्मण माने, पांडुरंग लाटे, यांच्यासह असंख्य भिमसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या