आई राजा उदो उदो ; चैत्र यात्रेचा अभूतपूर्व सोहळा: येरमाळा नगरीत भक्तीचा महापुर ! लाखो भाविक आज वेचनार मानाची चुनखडी : आजपासून आमराईत पालखी मुक्कामी .

 कळंब / विलास मुळीक 


तालुक्यातील येरमाळा येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त  भरणाऱ्या श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेला शनिवारी (दि.१६) सुरुवात झाली आहे. रविवारी या यात्रेतील मुख्य चुना वेचण्याचा कार्यक्रम असून या चूना वेचण्यासाठी  लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले आहेत. आई राजा उदो उदो चा जयघोष, संबळ, हलगी च्या गजराने येडेश्वरी नगरी दुमदुमून गेली होती. रखरखत्या उन्हात भाविक भक्तीत तल्लीन झाले होते तर दोन वर्षच्यां  खंडानंतर होणाऱ्या यात्रेमुळे चैतन्याचे वातावरण  होते.

आई येडेश्वरीच्या चैत्र यात्रेनिमित्त मुख्य दिवस असणाऱ्या चुनखडी वेचण्यासाठी येरमाळ्यात लाखो भाविक दाखल झाले आहेत. त्यानिमित्ताने मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, व  परराज्यातून येडेश्वरी चे भाविक येरमाळा नगरीमध्ये यात्रेच्या दोन दिवसापासूनच यायला लागले आहेत.  त्यामुळे भल्या पहाटेच भक्त येरमाळ्यात दाखल होताना दिसत आहेत. श्री येडेश्वरी देवीचे चैत्र यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात प्रारंभ झाला असून

रात्री साडेआठ वाजता देवीची पंचोपचार महापूजा आरती देवीच्या पालखीसह छबिना कार्यक्रम पार पडला. पारंपारिक पोत खेळण्याचा कार्यक्रम देवीच्या पुजाऱ्याच्यानी खेळला. हा कार्यक्रमाने जमलेल्या भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडनारा झाला.

पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी तसेच देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी आणि मुख्य मंदिरावर गर्दी केली होती.

रखरखत्या उन्हात ची पर्वा न करता आई राजा उदो उदो च्या जयघोषात दाखल झालेल्या भाविकांनी येडेश्वरीचे मुख्य मंदीर व येरमाळा परिसर गर्दीने फुलून गेला होता. जवळपास सहा ते सात लाख लोकांनी गर्दी केली होती. या रखरखत्या उन्हात मिळेल त्या जागेत सावलीसाठी आधार घेतला तर कुणी कपड्याची पाली उभी करून आपल्या मुक्कामाची तजवीज करून ठेवली होती. जागो जागी आलेले आराध्यांची जथ्थेच्या जथ्थे देवीच्या भक्तीत मग्न होऊन देवीची ची गाणी गात आनंदामध्ये तल्लीन झाले होते.


आज मानाचा कार्यक्रम

यात्रेतील मुख्य दिवस असलेल्या चुनखडी वेचण्याचा आजचा मुख्य कार्यक्रम आहे. त्यासाठी आज चुन्याच्या रानात मोठी गर्दी होते.  सुमारे दहा ते बारा लाख भाविक या कार्यक्रमाला हजेरी लावतात सकाळी देवीची पूजा व महाआरती करून मुख्य मंदिरावरून आमराई च्या दिशेने पालखीचे प्रस्थान होते. सकाळी  पालखी चुन्याच्या रानात येते, भाविक चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकतात, त्यानंतर पुढे पालखी आमराई मध्ये असलेल्या मंदिराकडे प्रस्थान करते व इथेच पाच दिवस पालखी मुक्कामी असते.


विवीध दुकाने थाटली....

श्री येडेश्वरी देवीची चैत्र यात्रा अवघ्या एक दिवसावर आल्याने विविध व्यवसायिकांनी राहट पाळणे, मौत का कुवा,  ब्रेक डान्स, डिस्को डान्स, रेल्वे गाडी, झुल झुला, नेमबाजी, रिंगण, हॉटेल खानावळी रसवंती फळांची दुकाने खेळण्यांची दुकाने ज्वेलरी कापड दुकान भांडी दुकान प्रसादिक भांडाराची दुकान मिठाई पिक्चर चा टुरिंग टॉकीज नारळाची दुकाने पेढ्याची दुकाने आदी दुकाने थाटली असून छोट्या व्यवसायिकांनी उन्हापासून बचाव होण्यासाठी रंगीबेरंगी लावून स्टॉल लावले आहेत. नववर्षाच्या कार खंडानंतर होत असलेल्या यात्रेमुळे यावर्षी समाधानकारक अशी गर्दीत आणि व्यवसायात वाढ होईल अशी अपेक्षा व्यवसायाकडून होत आहे.


चौकट :

आम्ही वर्षातून दोन वेळेस देवीच्या दर्शनासाठी येतो. आमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. गेली दोन वर्ष मंदिर बंद असल्यामुळे आम्हला कधी एकदा येरमाळ्याला येईल आसे झाले होते. आज देवीचे मनोभावे दर्शन झाल्यामुळे मन एकदम प्रसन्न झाले आहे.


मोहम्मद मुस्तफा जमिणा बिबी

कन्याकुमारी(मद्रास)

(देवी भक्त) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या