रिपोर्टर
युवक काँग्रेस सरचिटणीस सलमान शेख यांनी महाराष्ट्र विधिमंडळ समितीच्या गाडयांचा ताफा थांबवून समितीचे अध्यक्ष आ.रणजित कांबळे यांच्याकडे उस्मानाबाद बेंबळी रोडची कैफियत मांडली येणा—या जाणा—या लोकांना होणारा त्रास आमदार कांबळे यांच्या निदर्शनास अनुन देताच त्यांनी संबंधित अधिका—यांना चांगलेच झापले.
महाराष्ट्र विधिमंडळ समितीच्या 30 ते 35 आमदाराचे शिष्टमंडळ पहाणीसाठी जिल्हात दाखल झाले असताना उस्मानाबाद बेंबळी या मार्गाने समिती जात असल्याचे समजताच सलमान शेख यांनी उस्मानाबाद बेंबळी रोडचे 104 कोटीचे काम प्रलंबित आसल्याचे समीतीचे अध्यक्ष आमदार रनजित कांबळे यांच्या निर्देशनास आणून दिले. हे काम रखडल्याने वाहतूकीला अडथळा होत असुन लोकांना नाहक ञास होत असल्याने सलमान शेख यांनी सांगीतले. समितीच्या अध्यक्षासह शिष्टमंडळासमवेत चर्चा करताना युवक काँग्रेस सरचिटणीस सलमान भाई शेख,अतिक भाई सय्यद, रोहीत निकम,अजमेर शेख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या