महापुरुषांची जयंती कशाप्रकारे साजरी करावी याचा आदर्श राजेनिंबाळकर यांनी दाखवून दिला:भाजपा जिल्हाध्यक्ष

 उस्मानाबाद रिपोर्टर 

महापुरुषांच्या स्वप्नातील भारत देश घडविण्यासाठी युवकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यासाठी युवकांच्या सुप्त कलागुणांनाच महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करुन महापुरुषांची जयंती कशा प्रकारे साजरी करावी याचा आदर्श स्वजनहित सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी समाजाला दाखवून दिला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष काळे यांनी केले.

स्वजनहित सामाजिक बहुद्देशीय संस्था व युवा आधार प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज (दि.29) आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष प्रा.अस्मिताताई कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी ,माजी नगराध्यक्ष सुनील काकडे,नेताजी पाटील, प्रदिप शिंदे पांडुरंग लाटे , नितीन भोसले, पांडुरंग आण्णा पवार,दाजी आप्पा पवार, सचिन लोंढे ,प्रवीण शिरसाठ, देवकन्या गाडे, संदीप इंगळे, प्रीतम मुंडे; ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, कुलदीपसिंह भोसले; पंकज जाधव, स्वप्निल नाईकवाडी, गणेश ऐडके, राहुल शिंदे, जगदीश जोशी, प्रसाद मुंडे, निरंजन जगदाळे, धनराज नवले, सार्थक पाटील, ज्ञानेश्वर सूळ, ओमकार देवकते, नवनाथ सोलंकर, अमोल पेठे, ज्ञानेश्वर पडवळ, ज्ञानेश्वर शिंदे; आर्यन इंगळे, विद्या माने, पांडुरंग पवार, स्वजनहित सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना काळे म्हणाले, महापुरुषांना आज जाती-पातीच्या मर्यादेत अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तवकि भारत देशाला ओळख देण्याचे काम महापुरुषांनी केलेले आहे. त्यांच्या विचारांची आजही देशाला तेवढीच गरज आहे. महापुरुषांना अभिप्रेत असलेला भारत घडविण्यासाठी वक्तृत्व स्पर्धांसारखे उपक्रम कौतुकास्पद असून अशा उपक्रमांनी जयंती साजरी करणे हीच महापुरुषांना खरी आदरांजली असल्याचे ते म्हणाले.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी व भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राज्यभरातून आलेले स्पर्धक, पालक उपस्थित होते.

वक्तृत्व करणार्‍यांना नेतृत्व करण्याची संधी - अस्मिता कांबळे

स्पर्धेत उतरल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. वक्तृत्व हा गुण प्रत्येकाच्या अंगी असला पाहिजे. वक्तृत्वामुळे माणसाला प्रश्नांची जाणीव होते आणि वक्तृत्वामुळेच नेतृत्वाचीही संधी मिळते, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, वक्तृत्वासाठी मोठे कौशल्य लागते. काय बोलावे, कसे बोलावे याचे वक्त्याला भान असले पाहिजे. त्यासाठी ज्ञानाने समृद्ध असले पाहिजे, म्हणून जास्तीत जास्त वाचन करायला हवे. कोणती पुस्तके वाचावी यासाठी पालकांनी देखील जागृत असले पाहिजे. वक्तृत्व स्पर्धेत बक्षीसांबरोबर मिळालेला अनुभवही पुढील वाटचालीसाठी तितकाच महत्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या.

स्पर्धेच्या माध्यमातून विचारांचा जागर - राजसिंहा राजेनिंबाळकर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या विचारांची शिदोरी सातत्याने युवापिढी सोबत असावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा या अनुषंगाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असल्याचे मुख्य संयोजक तथा स्वजनहित सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

राज्यभरातून स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद

स्वजनहित सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या राज्यस्तरीय स्पर्धेला राज्यभरातून स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विद्यालयीन व महाविद्यालयीन (खुला) अशा दोन गटात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. 

सात वर्षाची चिमुरडीही स्पर्धेत

स्पर्धेमध्ये स्वानंदी पोतदार या सहा वर्षाच्या चिमुरडीने देखील सहभाग नोेंदवला आहे. तिच्या सहभागाचे उद्घाटन समारंभप्रसंगी मान्यवरांसह विद्यालयीन व खुल्या गटातील इतर स्पर्धकांनी कौतुक केले.

विजेत्यांना आकर्षक बक्षीसे

स्पर्धेत प्रथम विजेत्यास रु. 21,000/- द्वितीय रु. 11,000/-, तृतीय रु. 7000/- व उत्तेजनार्थ रु. 5000/- तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र अशी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे संयोजकांनी घोषीत केलेले आहे.


--

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या