आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कारवाई करा -ब्राम्हण समाजाचे मुख्यमंत्रांना निवेदन

 
परंडा:रिपोर्टर सुरेश बागडे 


सांगली जिल्ह्यातील इस्लमापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या व्यक्तव्याने हिन्दू धर्मातील रूढी ,परंपराचा चालीरीतीचा अवमान करण्यात आला आहे. त्यांचेवर कारवाई करावी. अशी मागणी ब्राहमण महासंघाच्या वतीने करण्यात आली.


 मंगळवारी (ता.२६) या बाबतचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , आमदार मिटकरी यांनी पक्षाच्या जाहिर सभेत हिंदू समाजाच्या चालीरीती परंपरेबाबत अपशब्द   टिंगल टवाळी केली आहे. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.   मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार मिटकरी यांचेवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तहसिलदार रेणूकादास देवणीकर यांना निवेदन देण्यात आले.


 यावेळी ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास कुलकर्णी , तालुकाध्यक्ष समीर कुलकर्णी ,कल्याण सागर बॅकेचे संचालक अजित पाटील ,सचिन कुलकणीं ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष मुकुंद देशमुख , महिला तालुकाध्यक्ष ज्योती भातलवंडे , शहराध्यक्ष वर्षा वैद्य , रोहिणी घोगले , स्नेहल पत्की, सचिन कुलकर्णी , महेश देशमुख , अक्षय देशमुख ,जयंत भातलवंडे , महेश कुलकर्णी , बापू चैतन्य , सच्चिदानंद कुलकर्णी  आदीसह ब्राह्मण समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या