कळंब येथे जागतिक नृत्य दिन साजरा
कळंब:-रिपोर्टर


शहरात जागतिक नृत्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बालकलाकारांनी शास्त्रीय नृत्य, चित्रपटातील नृत्य, लोकनृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमात रसिकांनी नृत्याची पर्वणी लाभली.

      येथील फ्युजन डान्स,ड्रामा, योगा फिटनेस स्टुडिओ च्या वतीने जागतिक नृत्य दिन साजरा करण्यात आला. संस्थेच्या सभाग्रहात शुक्रवारी (दि.२९) कार्यक्रम पार पडला यावेळी स्टुडिओ चे संचालक आशिष झाडके, शिवानी झाडके, स्वाती मुंडे, स्वाती चव्हाण, कल्पना थोरात, अनुजा सोनटक्के, रोहिणी थोरात, विजयश्री वाघमारे, विमल कोरडे, माधवी थोरात, प्रणिता खोसे, भाग्यश्री चांदोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. नृत्य स्टुडिओ तील चाळीस विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. गणेश कोत्वुकम या शास्त्रीय रचनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. शास्त्रीय रचनेच्या बहारदार नृत्यासाठी बाल कलाकारांनी भरभरून दाद मिळवली.श्रीकृष्णाच्या बाललीला आणि खट्याळपणा चे दर्शन घडवले. सामे सामे, गलतीसे मिस्टेक, कच्चा बदाम इत्यादी हिंदी गाण्यावर नृत्य लक्षवेधी ठरले. यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या