रिपोर्टर
सीएनजीच्या किमतीत ३० एप्रिलपासून प्रतिकिलो चार रुपये दरवाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेड कंपनीने घेतला आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात सीएनजीचा नवा दर ७६ रुपये प्रतिकिलो असा होणार आहे. मात्र पीएनजीच्या किंमतीत कोणतीही दरवाढ झालेली नाही.
देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमतीत भारत सरकारने १ एप्रिलपासून ११० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे एमजीएलकडून खरेदी केल्या जाणाऱ्या गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजीच्या किमतीत वाढ झाली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एमजीएलने अशा वाढलेल्या गॅसच्या किमती हळूहळू वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३० एप्रिल पहाटेपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) किमतीमध्ये प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. सीएनजीच्या सर्व करांसह मुंबई आणि आसपास प्रतिकिलोचा दर ७६ रुपये असेल. मात्र, देशांतर्गत पीएनजीच्या किमतीत कोणतीही वाढ होणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
0 टिप्पण्या