उस्मानाबाद रिपोर्टर
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात दिनांक १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येत आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यकर्माचे आयोजन करावयाचे आहे.याच धरतीवर राजसिंहा राजेनिंबाळकर जिल्हाध्यक्ष,भारतीय जनता युवा मोर्चा,धाराशिव यांच्या वतीने जिल्ह्यातील स्वातंत्र सैनिकांच्या सन्मान तसेच काही ठिकाणी प्रत्यक्ष तुरुंगवास भोगलेले व स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे अशा स्वातंत्र्य सैनिक यांच्या कुटुंबीयांचा सन्मान भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नितीन काळे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी धाराशिव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित सत्कारमूर्ती यांनी घडलेल्या जुन्या गोष्टींना सहकार्या समवेत उजाळा दिला सोबतच मार्गदर्शन केले.
आपणही स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा हा उत्सव, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन अशाप्रकारे केले पाहिजे की स्वातंत्र्य लढ्याची भावना, त्यामागील त्याग हे सगळे अनुभवता आले पाहिजे. ज्यात देशातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देखील वाहिली जाईल आणि त्यांच्या स्वप्नांमधील भारत घडविण्याचा संकल्पही असावा. ज्यामध्ये सनातन भारतच्या वैभवाची झलक देखील असावी आणि आधुनिक भारताची चमक देखील असावी. ज्यामध्ये अध्यात्माचा प्रकाश देखील असेल आणि आपल्या शास्त्रज्ञांची प्रतिभा आणि सामर्थ्य देखील दिसून येईल. हा कार्यक्रम, 75 वर्षातील आपली कामगिरी संपूर्ण जगासमोर सादर करण्याची आणि पुढील 25 वर्षांसाठी एक आराखडा, एक संकल्प घ्यायची संधी देखील प्रदान करेल. कारण 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याचे शतक साजरे करेल, तेव्हा आपण कुठे असू, जगात आपले स्थान काय असेल, आपण भारताला कुठवर घेऊन जाऊ आणि स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि स्वातंत्र्य लढा आपल्याला प्रेरणा देईल. एक मंचाची स्थापना केली जाईल आणि या मंचाच्या आधारे स्वातंत्र्याची 75 वर्षे भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीसाठी, त्या दिशेने पुढे जाण्यासाठी आमच्यासाठी दिशादर्शक प्रेरणादायक आणि प्रयत्नांची भावना जागृत करणारा असावा.
धाराशिव येथील सन्मान सोहळ्यास स्वातंत्र्य सैनिक बूबासाहेब जाधव चिलवडी,जी वाय यादव सर,भास्कर राव सांबराव नायगावकर तुळजापुर येथे श्री गंगाधर मुसळे या स्वतंत्रसैनिकांचा सन्मान केला गेला यावेळी
धाराशिव येथे उपनगराध्यक्ष अभय इंगळे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ओम नाईकवाडी ,सतिश जाधव,ता सरचिटणीस देवा नाईकल,जिल्हा सरचिटणीस कुलदीप भोसले ,शहराध्यक्ष सुजित साळुंखे,आत्मनिर्भर जिल्हा संयोजक सचिन लोंढे,प्रवीण शिरसाठ ,दाजी अप्पा पवार ,गिरीश पानसरे ,गणेश मोरे,हिम्मत भोसले,मेसा जानराव ,अक्षय नायगावकर ,जगदीश जोशी ,धनराज नवले,सार्थक पाटील ,आदित्य इंगळे, तुळजापुर येथुन युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंदजी कंदले, राम चोपदार, राजेश्वर कदम,परंडा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल पाटील,उमरगा शहराध्यक्ष अजय पाठक यांच्यासह जिल्हाभरातुन पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विविध ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी कुटुंब सदस्यांना भेट देऊन सद्भावना व्यक्त केल्या.
0 टिप्पण्या