महाराष्ट्र कामगार कल्याण गुणवंत पुरस्काराने कुलदीप सावंत यांचा सन्मान


    


उस्मानाबाद रिपोर्टर 


महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा कामगार कल्याण गुणवंत पुरस्कार कुलदीप सावंत यांना देण्यात आला.पुरस्कार वितरणावेळी सावंत यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.यावेळी  हसन मुश्रीफ ( मंत्री कामगार, ग्रामाविकास, महाराष्ट्र राज्य ) ओमप्रकाश ऊफॆ  बच्चु कडू ( राज्यमंत्री, कामगार, महाराष्ट्र राज्य)यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून विनिता वेद-सिंगल ( प्रधान सचिव कामगार )  डॉ.अश्र्विनी जोशी,  ( विकास आयुक्त कामगार ) , सुरेश जाधव (  कामगार आयुक्त महाराष्ट्र ) रविराज इळवे ( कल्याण आयुक्त महाराष्ट्र आदी मान्यवर उपस्थित होते , 

कुलदीप सावंत हे 12 वर्षापासून उस्मानाबाद एसटी आगार मध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय व राज्य खेळाडू घडवले आहेत, हॅन्डबाॅल डाॅजबाॅल या खेळाचे जिल्हा सचिव म्हणूनही कार्यरत आहेत, त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनी,व छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय उस्मानाबाद, व उस्मानाबाद आगारातील सर्व कर्मचारी व मित्र परिवार, आदी घटक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या