श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे अक्कलकोट कडे प्रस्थान:माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी घेतले पालखीचे दर्शन

 रिपोर्टर:


 स्वामी समर्थ सेवाभावी संस्था ,शाहु नगर उस्मानाबाद आयोजित श्री स्वामी समर्थ मंदीर शाहु नगर येथुन ते श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थान नगरी अक्कलकोट पर्यंत पायी दिंडी पालखी सोहळ्याचा प्रारंभ भक्तीमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. 

यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे मनोभावे पूजन करून वटवृक्ष देवनगरी अक्कलकोट कडे प्रस्थान झाले.

तसेच श्री स्वामी समर्थ देवस्थान परिसराची पाहणी करून आवश्यक असणाऱ्या सर्व प्राथमिक सोयी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन मकरंद राजे निंबाळकर यांनी दिले. व उपस्थित सर्व भक्तगणांना,नागरिकांना शुभेच्छा दिल्या..

याप्रसंगी अध्यक्ष श्री.मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, सचिव श्री विरेंद्र पत्रिके, नगरसेवक श्री अभिजित काकडे, दाजीप्पा पवार, विकास जाधव, अमर पाटील, मनोज पडवळ, राहुल पताळे, मोहन मुंडे , मुर्गे सर,आकोस्कर सर आदींसह परिसरातील भक्तगन, महिला माता भगिनी, नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या