आंजनसोंडा येथे तलावातच शेततळे दाखवून लाटले आनुदान ... जिल्हा कृषी अधिकारी यांचे यंत्रनेला तपास करण्याचे आदेश

 




रिपोर्टर: पाटबंधारे विभागाच्या तलावतच शेततळे खोदुन कृषी विभागा आणि पोकरा योजनेच्या माध्यमातुन लाखो रूपयाचे आनुदान लाटल्याचा प्रकार भूम तालुक्यातील आंजनसोंडा गावात उघड झाला आहे. खोटी कागद पत्रे दाखवून लाटण्यात आलेल्या आनुदानाची व्याजासहीत वसुली करावी आशी मागणी आसपासच्या शेतक—यांनी केली आहे.


शेतक—यांचे सिचंन क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारची पोकरा ही योजना लाभदायी ठरली मात्र या योजनेचा गैरवापर ही तेवडाच करण्यात आला.कृषी विभागातील अधिका—यांना चिरीमीरी देवून या याजनेचे अनुदान लाटण्याचा प्रकार आनेकवेळा घडला आहे. तसाच आनखी एक प्रकार समोर आला आहे.भूम तालुक्यातील आंजनसोंडा गावातील शेतकरी वसुदेव क्षीरसागर यांनी कृषी विभागाची दिशाभुल करत शेतक—यांसाठी अतिशय महत्वाची असलेल्या पोकरा योजनेला गालबोट लावले आहे. दुसरीकडचे शेत दाखवून पाटबंधारे विभागाच्या तलावातच शेततळे खोदुन शासनाला लाखो रूपयाचा गंडा घातला आहे.2020 मध्ये आंजनसोंडा हे गावा पोकरा योजनेमध्ये सामावाविष्ठ करण्यात आले.त्यावेळी वसुदेव क्षीरसागर यांनी  जिल्हापरीषदेकडून खोदण्यात आलेल्या पाटबंधारे विभगाच्या तलावातच 33 बाय 33 मिटरचे शेततळे कृषी विभागाकडून मंजूर करूण घेतले.कृषी विभाच्या आनुदानावर पुर्ण करण्यात आलेल्या शेततळयात कपडा मात्र पोकरा योजनेच्या आनुदानातून टाकण्यात आला.मुळातच गावालगत असलेल्या तलावातच शेततळे खोदण्यात आले असल्याने आनुदानास आडचन येवू नये म्हणून दुस—या शेताची कागदपत्रे कृषी विभागाला सादर करण्यात आली.    तलावात अतिक्रमन करूण शासकीय योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले असुन घडलेल्या प्रकाराची दखल घेवून शासनाची दिशाभुल करूण लाटण्यात आलेल्या आनुदानाची व्याजासहीत वसुली करण्यात यावी  आशी मागणी आसपासच्या शेतक—यांनी केली आहे.

जिल्हा कृषी अधिकारी यांचे यंत्रनेला तपास करण्याचे आदेश 


आशा प्रकारे शासनाने संपादीत केलेल्या जमीनीमध्ये शेततळे घेणे हे चुकीचे आहे.जर माहीती घेतल्या नंतर तसे निदर्शनास आले तर ज्यांनी हे शेततळे घेतले आहे.त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा कृषी अधिकारी तिर्थकर यांनी महाराष्ट्र लाईव्हशी बोलताना सांगीतले.  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या