पंतप्रधान घरकुल आवास योजनेंतर्गत घरकुलांना वाढीव निधी दयावा: महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 

रिपोर्टर 


धाराशिव-सध्या पंतप्रधान आवास योजना ग्रामीण व शहरी भागात चालू आहे ग्रामीण भागासाठी घरकुलांना दीड लाख रुपये देण्यात येत आहे तसेच शहरी भागासाठी दोन लाख 65 हजार रुपये टप्प्याटप्प्याने वाटप चालू आहे परंतु वाळू, सिमेंट, विट,मजूरी,यांचे संपूर्ण दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे एवढ्या कमी पैशात बांधकाम होणे शक्य नाही त्यामुळे अनेकांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहेत तरी केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील व शहरी भागातील गरजू गरिबांचा विचार करून त्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी ग्रामीण भागातील घरकुलासाठी तीन लाख रुपये व शहरी भागातील घरकुलासाठी चार लाख रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देवून करण्यात आली. यावेळी तालुका उपाध्यक्ष सलीम औटी, तालुकाध्यक्ष महेश जाधव,ढोकी शहराध्यक्ष रजनीकांत ढवारे, रामचंद्र नेटके, राहुल खडके अदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या