हाडोंग्री येथे जिल्हा मासिक चर्चासत्राचे आयोजन


रिपोर्टर 

आज दिनांक 25/03/2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा मासिक चर्चासत्राचे आयोजन भूम तालुक्यात करण्यात आले. जिल्हा मासिक चर्चासत्रामध्ये मौजे हिवरा येथील पंडित अच्युत उकिरडे यांच्या शेतावरील आंबा व राजमा लागवडीविषयी शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. मौजे हाडोंग्री येथील बाळासाहेब पाटील यांच्या शेतावर मोसंबी, बाबु, ड्रागनफूट लागवड विषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या ध्यानधारणा केंद्रास भेट दिली. सदर बैठकीच्या वेळी बाळासाहेब पाटील यांनी फळबाग लागवड, शेततळे आयुर्वेदिक वनऔषधी इ. बाबत सविस्तर माहिती दिली. आरसोली येथील सोमनाथ मुंडेकर यांच्या दोडका व कांदा लागवडीच्या भेट दिली. व उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले माणकेश्वर येथील चक्रे अनिल सिध्दाम यांच्या घनलागवड पध्दतीच्या आंबा व पेरू लागवडीस भेट दिली. तसेच मौजे शेखापूर येथील नानासाहेब बरकडे याच्या उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन शेतास भेट दिली. तसेच मौजे शेखापूर येथील आनंद दगडू हिवरे यांच्या पपई मधील कोबी लागवड पिकास भेट दिली. मौजे देवंग्रा येथील सतिश कुंडलिक टकले यांच्या टोमॅटो व काकडी लागवडीस भेट देण्यात आली व उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. मौजे वांगी येथील दशरथ मोरे यांच्या पेरू लागवड शेतास भेट दिली.


सदर जिल्हा मासिक चर्चासत्रास मार्गदर्शक म्हणून तूळजापूर येथील कृषि विज्ञान केंद्र येथील डॉ. मंडलिक उदयान विद्यावेता) डॉ. सूर्यवंशी (जिल्हा कृषि विद्यावेता) श्री अभिमान्यू काशिद (कृषि उपसंचालक), उपविभागीय कृषि अधिकारी भूम, श्री शुक्राचार्य मोसले तालुका कृषि अधिकारी श्री संजय गायकवाड व श्री संतोष कोयले, मंडळ कृषि अधिकारी श्री पुरुषोत्तम वाघमारे व श्री निखिल रायकर कृषि सहाय्यक श्री थळकरी, श्री रामगुडे, श्री देशमुख इ. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या