उस्मानाबाद रिपोर्टर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून धाराशिव जिल्हा मनसेच्यावतीने आगामी काळात पक्षाला भरभराटी येवून उत्तुंग यश मिळावे यासाठी आज दि.९ मार्च २०२२ रोजी श्री क्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेची यथासांग पुजाअर्चा करून राजमाता जिजाऊ महाव्दार समोर महाआरती करण्यात आली.तसेच देविस साकडे घातले.यावेळी धाराशीव जिल्ह्याचे जिल्हासंघटक अमरराजे कदम,जिल्हा सचिव दादा कांबळे,पुजारी सचिन भय्ये कदम,
शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटे उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष सलीमभाई औटी,अक्षय साळवे,तुळजापूर शहर सचिव विशाल माने,शहर उपाध्यक्ष वेदकुमार पेंदे,माजी शहराध्यक्ष धर्मराज सावंत,विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव समीर शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या