खासदाराच्या वाचाळ वीरांना भाजपाची पत्रकाच्या माध्यमातुन तंबी

 
 रिपोर्टर 


मागच्या काही दिवसांपासुन खासदार समर्थक सैनिकांचे भान हरपल्याचे दिसत आहे, खासदारांची नागरिकांच्या हितासाठी विशेष उपलब्धी नसल्याने त्यांची वाहवा करायची तर कोणत्या मुद्द्यांवर करायची अन त्यांचा खरा चाहता मीच अशी शाबासकीची थाप मिळवायची ही स्पर्धाच खासदर समर्थक सैनिकांमध्ये लागली आहे


खासदारांनी केलेल्या कामाची उदाहरणे देऊन जनतेत त्यांची प्रतिमा नागरिकांच्या हिताला जागृत नेता अशी करायची ही सैनिकांची तीव्र इच्छा आहे मात्र खासदार कोणत्याही सार्वजनिक हिताच्या बाबींवर लक्ष न देता सायकल चालवणे,जिममध्ये व्यायाम करणे यात तासनतास वेळ घालवताना दिसतात...मग सैनिकांनी खासदारांचे काय काम दाखवावे ? काही दाखवण्यासारखे काम नसल्याने हे सैनिक विरोधकांवर टिका करणे आणि त्यातून आपली प्रतिमा सजवने हे काम करत आहेत


जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा असो की अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, किंवा अतिरीक्त झालेला ऊस,शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत असो किंवा 12 महिने चालणारा आरोग्य सेवाभावी कार्य असो मा.राणाजगजितसिंह पाटील हे खासदारपेक्षा कितीतरी पटीने अधिक काम करत आहेत.


असाच प्रकार सोलापूर- तुळजापूर उस्मानाबाद रेल्वेमार्ग कामाच्या संदर्भात आहे, हा रेल्वेमार्ग केंद्र सरकारने मंजूर केला आहे ,त्यामुळे या कामाचे जे काही लहान मोठे  श्रेय आहे ते नागरिकांकडून भाजपच्या पारड्यात टाकल जात आहे...यामुळे व्यथित होउन सोमाणी या वाचाळ विराने आमचे नेते भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष नितिन काळे यांच्या बद्दल अपशब्द बोलताना दिसत आहे.


 आपल्या खासदार ला खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी याच नेत्या ने अहोरात्र कष्ट केले आहे हे कार्यकर्त्यांनी व खासदार यांनी देखील विसरू नये आणि खासदार यांनी असल्या सोमाणी सारख्या वाचाळ वीरांना आवर घालावा , अन्यथा भाजपा चा कार्यकर्ता आपणास माफ करणार नाही आणि या असल्या वाचाळ वीरांच योग्य बंदोबस्त करेल.


अरे रेल्वे देणारे सरकार भाजपा चे मंत्री भाजपा चे आणि तुम्ही कुठं टिमकी वाजवता , आणि पुन्हा याद राखा भारतीय जनता पार्टी च्या नेत्याबद्दल अपशब्द वापराल तर,


 अरे तुम्ही स्वतः लोकांचे राशन देखील मिळू दिले नाही या आधी आपण काय धंदा करत होता हे लोक विसरलेले नाहीत,  अरे लायकीत रहा  शब्द जपून वापरा,चुकीचे शब्द वापरून त्याची फळ भकासआघाडी भोगत आहे तेच जिल्ह्यात होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या