रिपोर्टर
विधीज्ञ राज कुलकर्णी यांची अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल शहरातील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते रमणअप्पा धोत्रीकर यांच्या वतीने कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सौ.सुरेखा धोत्रीकर,सौ.रेवा कुलकर्णी पिंपळगांवकर च्यासह कुटूंबिय उपस्थित होते.
एक उत्तम वक्ता, सिद्धहस्त लेखक, विचारवंत, वेगवेगळ्या चॅनल वरती चर्चात्मक कार्यक्रमात सहभागी होणारा,सतत वेगवेगळ्या दैनिकातून स्तंभलेखन करणारा लेखक, जेष्ठ विधीज्ञ,अत्यंत संवेदनशील सामाजिक भान असलेला उदयोन्मुख प्रतिभासंपन्न राजकीय व्यक्तीमत्व राज कुलकर्णी यांची अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल एक कौटुंबिक सोहळा आयोजीत करण्यात आला होता.यामधे त्यांचा कौटुंबिक सत्कार समर्थ अर्बन बँकेचे संस्थापक तथा विद्यमान जेष्ठ संचालक ,१९८५ ते १९९० भारतीय जनता पक्षाचे निर्वाचित नगरसेवक तथा १९९६ ते २००० या कालावधीत स्विक्रृत सदस्य असलेले आणि १९७४ साली तालुका सिंलिंग कमेटी मेंबर असलेले जेष्ठ भाजपा कार्यकर्ते रमणअप्पा धोत्रीकर यांनी केला.
0 टिप्पण्या