उस्मानाबाद:रिपोर्टर
राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त किरण जाधव हे दि.29 आणि 30 मार्च 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. दि.30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य सेवा हक्क हमी कायदा अंमलबजावणी करणारे सर्व जिल्हा कार्यालयाचे प्रमुख यांची वार्षिक आढावा बैठक घेणार आहेत.यावेळी श्री.जाधव आपले सरकार सेवा केंद्रासही भेट देणार आहेत.
0 टिप्पण्या