बावी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

बावी रिपोर्टर

वाशी तालुक्यातील बावी येथे सालाबादाप्रमाणे याहीवर्षी श्री हनुमान  मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ग्रामस्थ व भजनी मंडळ यांच्या वतीने दि‌.१९ मार्च रोजी सकाळी येथील मंदिरात प्रमुख महंत संत गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये गाथा विणा टाळ मृदंग आदि पूजा करण्यात आली.

 या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी पहाटे चार ते सहा काकडा भजन अकरा ते बारा गाथा भजन सात ते अकरा, ‌बारा ते दोन भजन विश्रांती  दोन ते पाच भगवत कथा. पाच ते सहा हरिपाठ.सात ते आठ भगवंता ग्रंथपूजन नऊ ते अकरा हरिकीर्तन आकार ते चार हरिजागर.असे कार्यक्रम संपन्न होणार असून या अखंड हरिनाम सप्ताह साठी दि १९ ते २६ मार्च या नंदनवन दिवशी कीर्तनकार ह. भ ‌.प. श्री आप्पासाहेब पवार घाटपिंपरी ,श्री ह भ प विजय कुमार पोफळे नागझरवाडी, श्री ह भ प गजेंद्र लिके खेरडा,  श्री ह भ प  मेघराज महाराज सामनगावकर, ‌श्री ह भ प आप्पासाहेब जावळे हळदगाव, श्री ह भ प देविदास धस खडकलगाव, श्री ह भ प दत्ता आंबीरकर डिकसळ यांची उपस्थिती राहणार असून या वेळी परिसरातील पुरुष महिला भजनी मंडळांची उपस्थिती राहणार आहे. श्री ह. भ .प . भगवान बाबा पाथरूड कर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम सप्ताह याची सांगता होणार असून बावी सह परिसरातील भाविकांनी  या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री ह.भ.प. कैलास महाराज कवडे व श्री ह भ प अक्रूर शिंदे. यांनी केले असून परिसरातील ग्रामस्थ मंडळ यांनी उपस्थित राहून काल्याच्या महा प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या