टक्केवारी जास्त आणि विकास कामे कमी: जि.प.च्या शेवटच्या बैठकीत निधी वरुन सभा तहकुब : अध्यक्षांनी पतिच्या माध्यमातुन केली टक्केवारी गोळा:सदस्य गिते

 


उस्मानाबाद रिपोर्टर

जिल्हापरिषद अध्यक्षांनी निधीवाटपात कमिशन घेवून आपली पोळी भाजून घेतली असल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत जिल्हापरिषेदेचे सदस्य ज्ञानेश्वर गिते यांनी केला.तसेच घेतलेली टक्केवारी उघकीस येवू नये म्हणून सदस्यांची मनधरणी करण्यासाठी सभा तहकुब करण्यात आली असल्याचे गिते यांनी म्हटले आहे. अध्यक्षांनी आपल्या पतिच्या माध्यमातुन टक्केवारी गोळा केल्याचा आरोपही गिते यांनी केला.सभेच्या वेळी सभागृहात गोंधळ आणि आरोपाच्या फैरी झाडण्यात आल्या त्यामुळे एकच गोंधळ पाहयला मिळाला.

उस्मानाबाद जिल्हापरिषद अध्यक्षा कांबळे यांचा कार्यकाळ विकास कामे कमी आणि टक्केवारी जास्त आशा पध्दतीनेच पुर्णत्वाकडे गेला.आज शेवटची सर्वसाधारण सभेचे आयोजन जिल्हापरिषदेच्या माध्यमातुन करण्यात आले होते.राष्ट्रवादी पक्षाचे सदस्य ज्ञानेश्वर गिते आणि महेंद्र धुरगुडे यांनी महत्वाचे प्रश्न उपस्थित करताच सभा तहकुब करण्यात आली.आशा प्रकारे सभा तहकुब करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे  विरोधी बाकावरील सदस्यानी म्हटले आहे. निधी वाटपात झालेला गोंधळ सावरण्यासाठी विरोधी पक्षातील सदस्यांना चेंबरला बोलाउन मनधरनी  करण्याचे काम अध्यक्ष यांनी केले असल्याचे आरोप विरोधी पक्षातील काही सदस्यांनी केले आहेत. घेण्यात आलेली टक्केवारी उघकीस येईल या कारणामुळे सभा तहकुब केल्याचे सदस्य गिते यांनी म्हटले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या