भूम बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक राजश्री शिंदे लाच प्रकरणी एसिबीच्या जाळयात

 


रिपोर्टर 


भूम येथिल जिल्हापरिषदेमध्ये बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक राजश्री शिंदे यांना 1500 रूपयाची लाच घेताना लाचलुच प्रतिबंधक विभागाकडून आटक करण्यात आली.सदरची कारवाई दि.14 मार्च 2022 रोजी करण्यात आली.असुन भुम पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आसल्याची माहिती मीळत आहे.

यातील तक्रारदाराचे वडील हे मैल कामगार म्हणून 2016 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर  2021 मध्ये त्यांची सुधारीत वेतननिश्चिती बाबत आदेश काढण्यात आले होते. सदर फरक रक्कम बिलाच्या रु.91257/- च्या चेकवर साहेबांची सही घेऊन देण्यासाठी आरोपीने तक्रारदार यांचेकडे 1500/- रुपयांच्या लाचेची पंचांसमक्ष मागणी करून पंचासमक्ष स्वीकारली.
सापळा अधिकारी: - प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक , ला.प्र.वि . उस्मानाबाद.मार्गदर्शक - डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र .वि. औरंगाबाद सापळा पथक - पोअ/ दिनकर उगलमुगले,मधुकर जाधव, अर्जुन मारकड, विशाल डोके ला.प्र.वि, उस्मानाबाद.

कोणताही शासकिय अधिकारी/कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,उस्मानाबाद येथे संपर्क साधावा.असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

फोन नं. 02472 222879

प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद

95279 43100

अशोक हुलगे, पो.नि.ला.प्र.वि.उस्मानाबाद

86524 33397)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या