उस्मानाबाद- रिपोर्टर
छत्रपती शिवाजी नाव नसून युवकांसाठी ऊर्जास्त्रोत असल्याचे मत स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा अखिल भारतीय कुलगुरू परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.वेदप्रकाश पाटील यांनी डॉ.व्ही.के.पाटील शैक्षणिक संकुल येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त बोलताना गौरवोदगार काढले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य सुरज ननवरे , डॉ.कैलास मोटे,प्राचार्य सतीश मातने,डॉ.क्रांतिवीर पाटील हे होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना डॉ.वेदप्रकाश पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन शास्त्र हे आजच्या पिढीला दिशादर्शक आहे ते व्यवस्थापन तरुण पिढीने जर अंगीकारले तर ते जीवनात कधीही अपयश येणार नाहीत तसेच छत्रपती शिवरायांच्या अर्थनीतीचा देखील युवकांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अठरापगड जातींना सोबत घेऊन चालणारे होते मात्र इतिहासकारांनी त्यांना एका धर्मापुरते जातीपुरते बांधून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे शल्य देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवले. त्यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम धनगर माळी अशा सर्व समाजाचे लोक सोबत होते तसेच त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोणीही त्यांच्या जवळचा व्यक्ती नव्हता त्यामुळे छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव हे मूल्य जपणारे व न्याय देणारे होते असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य सुरज ननवरे,
सूत्रसंचालन सिद्धी बचाटे तर आभार के.डी.बंडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक हरी घाडगे,एस.पी. पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अमर कवडे, डी.फार्मसी कॉलेजचे विभाग प्रमुख सुबोध कांबळे,प्रा.डॉ.गणेश मते,प्रा.दत्तात्रय घावटे,अशोक सोन्ने,प्रा.बुरगुटे यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल येथील विद्यार्थी,प्राध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या