लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी जाहीर केली सार्वजनीक सुटटी


रिपोर्टर 

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की,(रविवार, ६ फेब्रुवारी) भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आसल्याचे सुत्रांकडून सागण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या