उस्मानाबाद रिपोर्टर
चुकीचा गट नंबर दाखवून बेकायदेशिरपणे जमिनीची खरेदी विक्री केल्याचे निदर्शनास आले असुन जमिन खरेदी विक्री करणारावर त्वरीत कारवाई करावी आशी मागणी तक्रारदार शेतक—यांनी महसुल विभाग व पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
भूम तालुक्यातील अंजनासोंडा गावामधील गट नंबर 109अ मध्ये असलेली जमीन 108अ गट नंबर मध्ये असल्याचे भासवून विक्री करण्यात आली आहे.सदर जमिन ही तारामती ज्ञानोबा गुरव यांनी गावातीलच दत्तात्रेय पांडूरंग माळी यांना विक्री केली असुन ही जमिनीची खरेदी विक्री पुर्णपणे बेकायदेशिर असल्याचे निदर्शनास आले आहे.या माध्यमातुन प्रशासनाची आणि शेतक—यांची फसवनूक झाल्याचे उघड झाले असुन या बेकायदेशिर व्याव्हारामध्ये सामील असलेले खरेदी विक्री धारक आणि साक्षदार यांच्यावर त्वरीत कारवाई व्हावी आशी मागणी तक्रारदार शेतकरी यांनी महसुल विभागासह पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
0 टिप्पण्या