होय ..!! परवाचीच गोष्ट 11 फेब्रुवारी 2022 वृद्धाश्रमाला भेट दिली म्हणजे घडवून आणली ती म्हणजे सौ सावित्री जाधव यांच्या अथक परिश्रमाने ...
निमित्त होत आश्रमाला सर्वांनी मिळून दिलेल्या गिरणीचे पूजन ..
रंजल्या-गांजल्या जीवाची आस्थेवाईकपणे सेवा करणारे कुटुंब प्रमुख वडगाव नळी चे श्री लोखंडे महाराज व त्यांच्या प्रेमळ पत्नी .. हे सोज्वळ जोडपं इथल्या 32 वृद्धांची सेवा काळजीने करतय .. तरुणांनाही लाजवेल अस कष्ट करणारे हे माता -पिता आनंद वाटण्याचं मोठं काम करताहेत
उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही या समाजसेवेच्या व्रताने भारावून गेलेले लोखंडे महाराज पाहिले की आदराने माथा टेकवावसा वाटतो
सध्याच्या धकाधकीच्या काळात इतरांसाठी आयुष्य खर्ची घालणारे लोक औषधालाही मिळत नाहीत .. अश्या या महात्म्याला दंडवत घालावे तेवढे कमीच
सौ सावित्री जाधव यांनी त्यांच्या समस्या जाणून घेऊन मदत करण्याचे ठरवले व तसे आवाहन केले त्यानुसार वाशी नगरीतून खर्चाची रक्कम उभी करत त्यांना पायाभूत सुविधांची पूर्ती करण्याचे स्वप्न साकारत आहेत आम्ही केवळ खारीचा वाटा उचलत आहोत
दुःख,वेदना म्हणजे काय असतात हे तिथे गेल्यावर कळत..आयुष्यभर कष्ट करून पोटच्या मुलांना स्वावलंबी बनविणारे आईबापच निराधार होतात तेव्हा मृत्यूची वाट पाहात ,आठवणींचे धागे धूसर करून आसवांची बरसात झेलत आयुष्य कसेबसे जगताना पाहून संवेदनशील मन धाय मोकलून आक्रोश करू लागत
अशीच अवस्था आम्हा सर्वांची झाली होती
वृद्धाश्रम म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे तो पुढच्या पिढीत संक्रमित होऊ देऊ नये असं वाटत असेल तर आपल्या घरातील वृद्धांना अडगळ समजू नका,त्यांचा आदर करा,आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करु , पैश्यापेक्षा इतरही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे बिंबवण्याची गरज आज आहे पुन्हा एकदा एकत्र कुटुंबाची गरज निर्माण झाली आहे
काळाची पावले ओळखून वागण्याची, न लाजता कष्ट करण्याची सवय मुलांना लावू
आश्रमात आनंदाने गेली 9 वर्षे सेवा बजावणारे डॉ लाड अन्य व्यक्ती ज्यांची नाळ सामाजिक बांधिलकीची आहे,ते आज भेटले
आमच्याबरोबर के एम जे एम चे विद्यमान प्राचार्य डॉ कठारे, डॉ श्री व सौ गंभीरे,प्राध्यापक श्री डोके,श्री व सौ आवारे,श्री व सौ जगताप ,सौ माने,सौ नाईकवाडी ,श्री व सौ जाधव आणखी माझे काही अपरिचित सद्गृहस्थ तसेचसौ पारगावकर (जेष्ठ मार्गदर्शक निवृत्त शिक्षिका ज्यांनी 10,000 रुपये रोख मदत आश्रमाला दिली)
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे
दातृत्व या गुणांचे अनुकरण करण्याची शपथ जणू सर्वांनी मनामनात घेतली व जड अंतकरणाने पुन्हा भेटण्याची हृदयस्त ओढ घेऊन निरोप घेतला
शब्दांकन - सौ अनुराधा देवळे-पांडव
मुख्याध्यापिका
प्रा. शा. शिवशक्तीनगर वाशी
0 टिप्पण्या