काही अपप्रवृत्तीच्या हातात बँकेचा कारभार जाऊ नये म्हणून निवडणूक लढविली: आमदार राणाजगजितसिंह पाटील




उस्मानाबाद रिपोर्टर  

सत्तेतील तिन्ही पक्षांना एकत्रित येऊन भाजपा विरोधात लढावं लागलं, यातच सर्व काही आलं. दोन माजी मंत्री,एक खासदार, तीन आमदार,दोन माजी आमदार हे सर्व सत्ताधारी पक्षातील एकत्रित येऊन लढले. काही अपप्रवृत्तीच्या हातात कारभार जाऊ नये, बँकेची सुधारत असलेली परिस्थिती पुन्हा तेरणा कारखान्या सारखी होऊ नये, यासाठी निवडणूक लढविली.लोकशाहीमध्ये मतदार सर्वोच्च आहे. त्यांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो. पराभवाची कारणमीमांसा व निकालाचे आत्मचिंतन करू.

राज्यात सत्तेत असतानाही मागील दोन वर्षांपासून थकहमीचे पैसे यांना आणता आले नाहीत. बँकेला एक रुपयाचीही मदत सरकारकडून आणू शकले नाहीत. निदान आता तरी थक हमीचे पैसे आणतील अशी आशा करतो.

नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन. बँक पूर्वपदावर आणण्यासाठी आमच्या संचालक मंडळाने सुरू केलेले प्रयत्न ते सुरू ठेवतील, आसे मत व्यक्त करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मतदारांचे आभार ही मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या