बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्या बद्दल त्यांच्यावर कठोर कार्यवाही करा: भाजपा महिला मोर्चाच्या वतीने मागणी

उस्मानाबाद रिपोर्टर  


महाराष्ट्र सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात साताऱ्यात आंदोलन करताना बंडातात्या कराडकर यांनी  पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्या विरोधात जिल्हा पोलीस अधिक्षक यांना भाजपा महिला मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले तसेच कराडकर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.  


कराडकर यांनी त्यांच्या सडलेल्या मानसिकतेतुन ही वक्तव्य केले आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे, परंतु ते करताना त्यांनी सार्वजनिक जिवनातील स्त्रियांना टार्गेट करुन त्यांचे चारीत्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या अशा वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे.

तरी त्यांच्यावर कठोर अशी कार्यवाही व्हावी आशी भाजपा महिला मोर्चा धाराशिवच्या वतीने पोलीस अधिक्षक यांच्या कडे निवेदनाच्या माध्यमातुन मागणी करण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या