भुमच्या उपनिबंधकाकडून तुकडा बंदी कायकायद्याचे तिनतेरा: जिराईत जमिनीला बागायत दाखउन केली 78 गुटयांची रजिस्ट्री: घेणार देणारासह साक्षदारांवर कडक कारवाईची मागणी


उस्मानाबाद रिपोर्टर 


जिल्हयात तुकडेबंदीचा कायदा असताना जिराईत जमीनीला बागायत दाखउन एका सर्वेनंबर मधील क्षेत्र आणि दुस—या सर्वे नंबर मधील चतुरसिमा दाखवत 78 गुटयांची बेकायदेशिर रजिस्ट्री केल्याचे प्रकरण भूम रजिस्ट्री आॅफिसमध्ये उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.उपनिबंधकासह घेणार देणार आणि साक्षदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकार श्रीराम क्षीरसागर यांनी केली आहे.


भूम तालुक्यातील अंजनसोंडा गावातील तारामती ज्ञानोबा गुरव यांनी त्यांची जमीन गावातीलच दत्तात्रेय माळी यांना काही दिवसापुर्वी विक्री केली आहे.सदर जमीन तारामती गुरव,शंकर विश्वंभर पंडित,संगिता संतोष आगाशे यांनी संगनमत करूण दत्तात्रेय पांडूरंग माळी यांना बेकायदेशिर पध्दतीने विक्री केली असुन शासनासह शेतक—यांची सुध्दा फसवनू केल्याचे उघड झाले आहे.जिल्हयात तुकडाबंदी कायदा अस्थित्वात असल्याने 2 एक्कर च्या आत जिराईत जमिनीची ​रजिस्ट्री करणे बंधनकारक आहे. विक्री करण्यात आलेली जमीन पुर्णता जिराईत असुन त्या जमिनीला कूठल्याही प्रकारचे पाण्याचे साधन नसताना चिरीमिरी देवून बागायत असल्याचे भासवण्यात आले आहे. जिल्हयात अदयवत असलल्या तुकडा बंदी कायदयाला पळवाट काडत 78 गुंन्टे ​जमिनीची बेकायदेशिर रजिस्ट्री केल्याचे उघड झाले आहे.महत्वाचे म्हणजे विक्री करण्यात आलेली जमिन सर्वे नंबर 108अ मध्ये दाखवण्यात आली असुन तिच्या चतुरसिमा सर्वे नंबर 109अ मधील दाखवण्यात आल्या आहेत.सदर जमिन खरेदी विक्री झाल्यावर भुमीअभिलेख कार्यालयाच्या रेकॉर्ड मध्ये पाहीले आसता ही बाब उघकीस आली.सदर खरेदी विक्री चा फेरफार तक्रारी आर्जाच्या माध्यमातुन आडवण्या आला असुन या फसवेगीरी प्रकरणाची दख्खल घेवून संघन मताने गुन्हेगारी केलेल्या देणार घेणार आणि साक्षदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकार श्रीराम क्षीरसागर यांनी पोलीस प्रशासनासह महसुल विभागाकडे केली आहे.   
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या