भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी: मुख्यमंत्री यांना निवेदन

 

उस्मानाबाद रिपोर्टर 

राज्यातील ओबीसी विरोधी आपल्या महा विकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे व उदासीन भूमिकेमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्णत: स्थगित झालेले आहे. राज्यातील गेल्या सहा महिन्यात सात जिल्हा परिषद व 106 नगरपंचायतीच्या निवडणुका या ओबीसीच्या राजकीय आरक्षणाशिवाय घेण्यात आल्या. एकीकडे 52 % च्या वर असणाऱ्या ओबीसी समाजावर असा अन्याय महाविकास आघाडी सरकार करीत आहे. व दुसरीकडे महा विकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाज हा ब्राह्मणवाद्यांचा पगडा असलेला समाज आहे, ओबीसी समाजाचा संघर्षाचा कोणताही इतिहास नाही त्यामुळे माझा ओबीसी समाजावर फार विश्वास नाही असे वक्तव्य करून समस्त ओबीसींचा अपमान केलेला आहे.एकीकडे ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे दुष्ट काम करायचे व दुसरीकडे वरील प्रमाणे वक्तव्य करून समस्त ओबीसी समाजाला डिवचण्याचे काम करायचे अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आघाडी सरकारमधील मंत्र्यांची दिसून येते.

वरील वक्तव्य करणारे मंत्री श्री जितेंद्र आव्हाड यांनी समस्त ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी व आपण त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागून घ्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तीव्र आंदोलन उभारेल याची आपण नोंद घ्यावी.

यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.खंडेराव चौरे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव पिराजी मामा मंजुळे, लक्ष्मण माने, पांडुरंग लाटे गुरुजीभाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस परशुराम देशमाने, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सतीश वैद्य, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत हापटे भातंब्री चे उपसरपंच रवि बंडगर, नगरसेवक दाजी अप्पा पवार, ओबीसी मोर्चा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संतोष क्षीरसागर वैभव हांचाटे, बबन सोनवणे, निखिल अल्कुंटे, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या