वाशी रिपोर्टर
तालुक्यातील सारोळा (मां ) येथील विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन पदाचे मतदान दि - १४ रोजी वाशी येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे पार पडले, या झालेल्या निवडणुकीत चेअरमन पदी शिवसेनेचे सखाराम भगवान मोरे, तर व्हाईस चेअरमन पदी बाळासाहेब मोरे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी सोसायटीचे सभासद शिवाजी मोरे, विमल विश्वंभर काळे, त्रिवेणी अरुण मोरे, संभाजी शिंदे,उपस्थित होते .
या झालेल्या निवडीबद्दल भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक केशवजी सावंत व वाशी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य विष्णुपंत मुरकुटे यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाचा सत्कार केला . गावचे यावेळी उपसरपंच सुनिल मोरे,महेंद्र मुरकुटे, शिवाजी डोईफोडे, तुळजीराम मोरे, रामहारी मोरे, विश्वंभर काळे, संभाजी शिंदे, अनिल मोरे, सिद्धेश्वर मुळे, आबा मोरे उपस्थित होते .
0 टिप्पण्या