ढोकी पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरिक्षक राउत यांचा सत्कार

 


रिपोर्टर सागर पवार

कसबे तडवळे - उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील पोलिस चौकीत ढोकी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश बनसोडे व पोहेकॉ उपेंद्र कुलकर्णी यांच्या बदली निमित्त तर ढोकी पोलिस ठाण्याचे नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदिश राऊत यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

        ढोकी पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश बनसोडे व पोहेकॉ उपेंद्र कुलकर्णी यांची उस्मानाबाद येथे बदली झाली.व नळदुर्ग येथून बदली होऊन ढोकी पोलिस ठाण्यात आलेले नूतन सपोनि जगदीश राऊत यांचा कसबे तडवळे येथील पोलिस चौकित पञकार व ग्रामस्थांच्या वतीने एकञ सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

      या वेळी जिल्हा परिषद माजी सदस्य कोंडाप्पा कोरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनिल वळेकर, बंडू करंजकर, नाना पवार ,शंकर पवार ,शकील कोतवाल  पञकार भागवत शिंदे, विकास उबाळे, नूर शेख, सुहास सावंत, सागर पवार, तडवळा बीटचे बीट अंमलदार गजेंद्र गुंजकर व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या