उस्मानाबाद रिपोर्टर
महाराष्ट्र सरपंच परिषेदेच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदी भुम तालुक्यातील आंजनसोंडा येथिल सरपंच अरूण पाटील यांची निवड करण्यात आली असुन त्यांना परिषेदेचे अध्यक्ष,सचिव अदि पदाधिकार—यांच्या हास्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
जनता आणि प्रशासन यांच्यातील दुवा समजल्या जाण्या—या सरपंच या पदासाठी आनेक नवयुवक आपला जिव ओतुन काम करतात.यांना प्रोत्सान आणि खंबीर साथ देण्यासाठी महाराष्ट्र सरपंच परिषद काम करते.ग्रामीण भागातील जनतेच्या विकासाठी प्रतेक सरपंचाने काम करावे हा हेतु समोर ठेवून या परिषदेची स्थापना करण्यात आली आसुन लोकांच्या समस्या सोडवून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी या परिषदेमधील प्रतेक सदस्य काम करतो.या पध्दतीच्या कामाची पात्रता अंगी असल्याने महाराष्ट्र सरपंच परिषेदेच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदी चार वर्षासाठी अरूण पाटील यांची निवड करण्यात आली आहे.या निवडी बददल त्यांचे सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या