सर्वसामान्य जनतेला हक्काचे व्यासपीठ व सहकार्य करणारे चॅनल म्हणून रेडीओ तेरणा महत्वपूर्ण भुमीका बजावेल - आ.राणाजगजितसिंह पाटील

 
उस्मानाबाद रिपोर्टर ‘आपली माणसं..... आपला आवाज...!!!’  ही टॅग लाईन घेऊन सुरु करण्यात येत असलेला रेडीओ तेरणा एफ एम चॅनल युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. यामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा हेतू असून सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडण्यासाठी व हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात रेडिओ तेरणा महत्वपूर्ण भुमिका बजावेल असे प्रतिपादन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी स्व. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरु करण्यात येत असलेल्या सामुहीक रेडीओ केंद्र ९०.४ एफ.एम.च्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले.


आई साहेबांनी आरोग्य क्षेत्रा मध्ये जे मोठे काम केले आहे. त्यांच्या प्रेरणेने आम जनते पर्यंत आरोग्य सुविधा कशा पुरवायच्या यासाठी सेवाभावी संस्था, सीएसआर या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. आजच्या या पवित्र दिनी डॉ. साहेबांच्या आशीर्वादाने एक मोठा उपक्रम आपण सुरु करत असून युवक युवतींना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी तसेच अडी अडचणीतील व्यक्तींना कसा न्याय देता येईल यासाठी काम केले जाणार आहे. आपण करत असलेल्या कामामध्ये जे यश मिळत त्यामध्ये तेरणा परिवाराचा सिंहाचा वाटा असल्याचही ते यावेळी बोलताना म्हणाले.


यावेळी बोलताना श्री. नितीन काळे म्हणाले कि, डॉक्टर साहेब म्हणजे हिरे शोधून पैलू पाडणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या भगीरथ प्रयत्नांना जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रामध्ये भरीव वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात तेरणा परिवाराने अप्रतिम काम केले असून  जिल्ह्यातील सामान्य व्यक्तीचा आवाज बुलंद करत आकांक्षित जिल्ह्याच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तेरणा रेडीओ निश्चितच मोलाचे योगदान देईल अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.


यावेळी रेवणसिध्द लामतुरे यांनी ऐतिहासीक संदर्भ देत, आकाशवाणी ही संकल्पना पुर्वापार चालत आलेली असून वासुदेव-देवकीला जेव्हा आठवा पुत्र झाला होता, तेव्हा झालेल्या आकाशवाणीचा संदर्भ देत समाजाच्या जडणघडणी मध्ये आकाशवाणीचे महत्व अधोरेखित केले. विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी या सर्वांच्या उत्कार्षामध्ये रेडीओ तेरणा मोलाचे योगदान देईल असा विश्वास व्यक्त केला.


यावेळी बोलताना आकाशवाणी उस्मानाबाद केंद्राचे प्रमुख श्री. उन्मेश वाळिंबे यांनी श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी मनापासून बोलावे लागते आणि हेच आकाशवाणीच्या यशाचे गमक असल्याचा मूलमंत्र दिला. यावेळी एम.डी. देशमुख सर म्हणाले कि, जिल्ह्याचा आवाज बुलंद करणाऱ्या डॉ. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोज्वळ, सात्विक माउलींच्या जयंती दिनी तेरणा परिवाराने सुरु केलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना  दत्ता कुलकर्णी यांनी स्व. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्ह्याच्या इतिहासात अभिनव उपक्रम राबवीत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या