खरीप २०२१ मध्ये झालेल्या पीक नुकसानी पोटी मंजुर विमा सोमवार दि.६/१२/२०२१ पासुन उस्मानाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार असल्याचे बजाज अल्लायन्झ कंपनीच्या कृषी विभागाचे देशाचे प्रमुख आशिष अग्रवाल यांनी आ.राणाजगजितसिंह पाटील यांना आश्वासीत केले आहे. नुकसान भरपाईची रक्कम साधारणत रुपये १५ ते १८ हजारच्या दरम्यान राहणार आहे.
पावसातील खंड व अतिवृष्टीमुळे खरीप २०२१ मध्ये पीकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. प्रत्यक्षात रक्कम खात्यावर जमा झाल्यानंतर कृषी आयुक्तांना भेटणार असल्याचे आ.राणाजगतिसिंह पाटील यांनी सांगीतले आहे.
0 टिप्पण्या