राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द पुढील दिनांक स्वतंत्रपणे जाहीर होणाररिपोर्टर -

लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवार ,दि 2 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात अली आहे . सुधारित दिनांक स्वातंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे ,असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी कळविले आहे. 

         कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात जाहिरात प्रसिध्द झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली आहे . काहींची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे,अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाने दि.17 डिसेंबर-2021 रोजी निर्णय घेतला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा  आयोगामार्फत रविवार दि.02 जानेवारी-2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 पुढे ढकलण्यात अली आहे. 

                         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या