नगराध्यक्ष नाही राहीलो तरी शहराच्या विकासाठी काम करत राहील: माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निबांळकर




जनतेच्या विश्वासामुळेच पाच वर्ष काम करू शकलो 

उस्मानाबाद रिपोर्टर

मी जनतेच्या विश्वासामुळेच पाच वर्ष काम करू शकलो तसेच पक्षाने ही माझ्यावर विश्वास ठेवून आगदी थेाडया वेळात मला संधी दिली.त्या संधीला पात्र ठरत मी माझ्या कामाची पाच वर्ष पुर्ण केली.पुढील काळात मि नगराध्यक्ष जरी नाही राहीलो तरी शहराच्या विकासासाठी काम करत राहील आशी भावना माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली.तसेच पाच वर्षात केलेल्या विकासात्मक कामाचा आराखडा त्यांनी या वेळी मांडला.ज्यांना माझ्या नगराध्यक्ष पदाची दोन महिण्याची सुध्दा खात्री नव्हती यांच्यासह सर्वाचे आभार मानतो असे मकरंद राजे निंबाळकर शेवटी म्हणाले.


 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका वेळेवर होण्यास अडचणी येत असल्याने निवडणुका विलंबाने घ्याव्या लागत आहेत जिल्ह्यातील आठ नगर पालिका पैकी काहींची मुदत आज संपत आहे मुदत संपणाऱ्या नगरपालिकावर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश शासनाने सोमवारी काढले आहेत. यात काही ठिकाणी मुख्याधिकारी वर तर काही ठिकाणी उपविभागीय अधिकारी वर प्रशासकाची जबाबदारी असणार आहे.

त्या अनुशंगाने उस्मानाबाद नगराध्यक्षाचा कार्यकाल आज संपत असुन नगरपालीकेचा कारोभार नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे.या धरतीवर माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी गेली पाच वर्षा केलेल्या कामाचा आराखडा पत्रकार परिषदेमध्ये मांडला.  


गेली पाच वर्षात केलेल्या कामाचा आराखडा   


उस्मानाबाद पालिकेचे आदी असलेले वार्षीक उत्पन्न आडीच ते तिन कोटी माझ्या कार्यकाळात ग्रिन झोन साठी 5 टक्के प्रमाणे कर भरना आणि इतर बाबीतुन नउ ते साडेनउ कोटी पर्यत वाढवण्याचा मी प्रयत्न केला.तसेच विकास कामासाठी 2016 ते 2017,2017 ते 2018 आणि 2018 ते 2019 या वर्षामध्ये योग्य तो निधी मिळाला नाही.तरी सुध्दा कार्यात्मक आनुदानावर 20 कोटी रूपयांची विकास कामे मी   केली.माझ्या आजपर्यतच्या कार्यकाळात 86 सर्वसाधारण सभा आणि विशेष सभा घेतल्या त्यामध्ये 2774 विषय मांडले.आणि त्यापेकी 95 टक्के विषय मंजूर झाले.तसेच 1508 घरे रमाई आवास योजनेतुन आणि 1074 घरे पंतप्रधान योजनेतुन मंजूर करण्यात आली.शहरात 10 हजार  ईएसएल या लाईट बसवण्यात आल्या त्यामुळे 15 लाख असलेले लाईट बिल 8 लाखावर आले.पाणीपुरवठा संदर्भात अमृत अभियानाच्या माध्यमातुन 2051 पर्यंतची शहराची लोकसंख्या लक्षात घेवून काम करण्यात आले.शहरात 52 कोटी रूपये खर्च करूण 90 किलोमिटर पाईपलाईन करण्यात आली.तसेच स्वच्छ भारत मिशन अभियानार्तगत  25 घंटा गाडया,6 मोठी वाहन या सह इतर मशनरी खरेदी करण्यात आल्या.त्याच बरोबर ई टॉयलेट साठी आडीच कोटी रूपये निधी मिळाला असुन तेही काम करण्यात येईल.महाविकास आघाडीच्या काळातच जास्त निधी उस्मानाबाद पालीकेला मिळाला असुन आमदार खासदार आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्यामुळेच ​जास्त विकास निधी   

उस्मानाबाद पालिकेला मिळाला असल्याचे राजे निंबाळकार यांनी सांगीतले.गेली दोन वर्षा पासुन कोरोनाचे संकट असल्याने आनेक बरीच नियोजीत कामे निधी आभावी करण्याची राहुन गेली आहेत आशी खंत देखील माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी व्यक्त केली.     


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या