उस्मानाबाद रिपोर्टर
विज्ञानवादी विचारवंत शिक्षणमहर्षी आणि भारताचे पहीले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीदिनांनिमीत्त आज नगरपालीकेत फोटो फ्रेम नसल्याने फळीच्या तुकडयाला कॉप्यूटर प्रिंट लावून पुजन करण्यात आले.हे दुर्दैवीच म्हणावे लागेल.
डॉ.पंजाबराव देशमुख यांनी आपले संगळे आयुष्य समाजकारण आणि लोकहितासाठी घालवले.लाखो रूपयांची उलाढाल करणा—या उस्मानाबाद नगरपालिकेकडे साधी फोटो फ्रेम नसावी यापेक्षा आश्चर्याची दुसरी गोष्ट काय?
डॉ.पंजाबराव देशमुख यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य
१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना. १९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना. १८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह . लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.
महाराष्ट्राच्या शिक्षणाचे शिल्पकार दोन भाऊ-त्यात भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील हे आहेत.देशातील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेबांनि १९३१ मध्ये अमरावती येथे केली.यानंतर विदर्भाचा ‘शैक्षणिक विकास भारतीय शेती शेतकरी आणि बहुजन उद्धाराची चळवळ' हे भाऊसाहेबांच्या जीवनाचे ध्येय ठरले.बहुजनांच्या शिक्षणातील अडचण हि प्रतीगाम्यांची मनुवादी विचारधारा आहे हि मनुवादी विचारधारा नेस्तनाभूत करण्यासाठी अखंड प्रयत्न केले.शोषितांचे उद्धारकर्ते आणि कृषकांचे कैवारी असलेल्या भाऊसाहेबांनी "जगातील शेतकऱ्यांनो संघटीत व्हा" हा मंत्र दिला.देशाचे कृषिमंत्री असताना १९५९ ला शेतकऱ्यांसाठी ‘जागतिक कृषि प्रदर्शनाचे" आयोजन केले.तसेच जपानी भातशेतीचा त्यांचा प्रयोग उल्लेखनीय आहे.ते कृषि विद्यापीठाच्या कल्पनेचे जनक आहेत.
शिक्षण,शेती,सहकार,अश्पृश्योद्धार,जातीभेद निर्मुलन,धर्म इ.विविध क्षेत्रात त्यांनी अवाढव्य कार्य केले.ग्रामीण समाज पोथीनिष्ठ आणि परंपरानिष्ट असल्याने त्यांच्यात अज्ञान,अंधश्रद्धा,दैववाद,अवैज्ञानिकता,देवभोळेपणा खच्चून भरल्यामुळेच हा समाज शिक्षणापासून वंचित राहिला हे त्यांना ठाऊक होते.तसेच ब्राम्हणी वर्णवर्चस्ववाद हा ग्रामीण बहुजन समाजाला पद्धतशीरपणे शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठीचा प्रयत्न होता.खऱ्या अर्थाने भारतातील बहुजन समाज हा गुलामगिरीच्या श्रुन्कलांनी जखडलेला होता आणि १०% सेटजी,भटजी,लाद्जी हा वर्ग सरकारी वर्ग नोकऱ्या,उच्चपदे,सोयी सवलतीचा लाभ घेत होता.
जुलै १९२६ नंतर भारतात परत आल्यावर चातुर्वर्णप्रणीत जातीव्यवस्था , अश्पृश्यता, अज्ञान,दारिद्र्य,पारतंत्र्य यासाठी स्वत:ला पूर्णत: वाहून घेतले.१९२७ सालच्या मोशीच्या हिंदुसभेचा अधिवेशनाचा डॉ.पंजाबराव देशमुखांनी ताबा घेतला व आपल्या ओजस्वी भाषणातून सबंध श्रोतावर्ग काबीज केला. चातुर्वर्ण, अश्पृश्यता,जातीभेद याचा निषेध ठराव वामनराव घोरपडे यांनी मांडला व भाऊसाहेब याला अनुमोदन देताना म्हणाले, "आमची गुलामगिरी नष्ट करण्याकरिता अस्पृशता निवरनासारख्या सुधारनाच्या चिठ्ठ्या हिंदूधर्माला जोडून आम्ही त्याची भोके बुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत.चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजन दुरुस्त झाला नाही तर तो रांजनच फोडून टाकण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही." हे भाऊसाहेबांचे उर्वरित कार्य शिवश्री.पुरुषोत्तम खेडेकर,डॉ.आ.ह.साळुंके,इतिहासाचार्य मा.म.देशमुखान्सारख्या कोट्यावधी बहुजन बांधवांनी १२ जानेवारी २००५ रोजी मातृतीर्थ सिंधखेडराजा येथे शिवधर्माचे प्रगटन करून केले आहे.आता चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजन फुटल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुता अशी लोकशाही या देशात अस्तित्वात येईल.
डॉ.पंजाबराव देशमुखांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यावर चिडलेल्या मनुवाद्यांनी त्यांच्या खुनाचाही प्रयत्न केला.पण भाऊसाहेब डगमगले नाहीत,पुढे त्यांनी २६ नोव्हेम्बर १९२७ रोजी सोनार कुटुंबात जन्मलेल्या कु.विमल वैद्य या युवतीशी आंतरजातीय विवाह करून मराठा-सुवर्णकार नातेसंबंध जुळवून आणले.त्यांनी १९३० मध्ये अस्पृश्य पित्तर केला.तसेच हिंदू देवस्थान संपत्ती बिल १९३२ मध्ये आणले.भाऊसाहेबांनी डॉ.बाबासाहेबांसोबत १९२७ मध्ये अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला.मंदिर प्रवेशामागे ईश्वर भक्तीचा त्यांचा उद्देश नव्हता.भाऊसाहेबांचा देवावर विश्वासच नव्हता.ते म्हणत ,"मूर्तीत देव असेल तर मूर्तीत देव घडविणारा कारागीर हा देवाचा बापच ठरेल."
खरोखरच आजही डॉ.भाऊसाहेबांचे कार्य शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक,संस्थाचालक,शिक्षणतज्ञाना तसेच बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे.
0 टिप्पण्या