मराठवाड्यातील सानेगुरुजी हरवले


रिपोर्टर

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सरचिटणीस आदरणीय गुरुवर्य के.टी .पाटील  यांची आज प्राणज्योत मालवली ,एका शैक्षणिक युगाचा अस्त झाला .                          उस्मानाबाद येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सरचिटणीस गुरुवर्य के .टी पाटील सर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील चिंचणी- अंबक या गावात  जन्म झाला. सुरुवातीपासूनच शिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या बप्पा यांनी 1952 मध्ये इंग्लिश मधून ओनर्स व बीए.बी.टी पदवी घेतली असे उच्च शिक्षण घेतलेले तरुण त्यावेळेस क्वचित सापडत असत वास्तविक पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये अनेक कारणावरून त्यांना मुख्याध्यापक पदाची ही ऑफर आलेली होती परंतु शिक्षणाची खरी गरज कुठे आहे याचा विचार करून माळरानावर वसलेल्या, दुष्काळग्रस्त असलेल्या उस्मानाबाद ची निवड शिक्षणाची कर्मभूमी म्हणून केली.  शिक्षणाची खरी गरज ही उस्मानाबाद सारख्या ठिकाणी आहे याचा विचार करून बप्पांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळा ची स्थापना केली. त्यामुळे आज उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची गंगा अवतरली .उस्मानाबाद मधून  डॉक्टर इंजिनीयर, अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक ,शिक्षक हजारोंच्या संख्येने तयार झालेत. आज बप्पानी आयुष्यभर शिक्षणासाठी केलेला यज्ञ थांबविला आणि आपला देह ठेवला. बाप्पांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली *आज दिनांक 25 डिसेंबर 2021 सायंकाळी 5.30वा हातलाई मंगल कार्यालयाच्या जवळ च्या शेतामध्ये*  अंत्यविधी होणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या