आँनलाईन खरेदीसाठी ५ वर्षीय बालकाची केली हत्या: आरोपी पोलीसांच्या ताब्यात

 
उस्मानाबाद रिपोर्टर 


वडिलांच्या एटीएम कार्ड मधुन आँनलाईन खरेदी केली होती वडिल खर्च केलेले पैसे विचारतील म्हणुन पैशाच्या जुळवा जुळवीसाठी ५ वर्षाच्या बालकाची निर्दयी पणे हत्या करुन त्याच्या कानातील सोन्याच्या बाळी काढुन घेतल्या व प्रेत रिकाम्या हौदात फेकले. आरोपीने रात्रभर क्राईम पेट्रोल पाहिला अल्पवयीन गुन्हेगाराला ३०२ किती शिक्षा होते याचा देखील अभ्यास केला होता.


मन सुन्न करणारी घटणा काल उघड झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तुळजापुर तालुक्यातील मार्डी सांगवी येथील ५ वर्षाचा ओम मनोज बागल हा तापीची गोळी आणायला परवा दुपारी बाहेर पडला तो पुन्हा आलाच नाही नातलगांनी परवा दिवसभर गावात शोधा शोध केली. ओम कुठेच सापडत नसल्यामुळे परवा रात्री तुळजापुर पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली होती.


काल सकाळी ७ वाजता ओम बागल राहत असलेल्या घरा शेजारील घरात ओमचा मृतदेह आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली ओमच्या अंगावर खरचटलेल्या खुणा आढळुन आल्या ओमचा गळा नायलाँनच्या दोरीने आवळुन खुन करण्यात आल्याचे दिसत होते मयत ओमच्या कानातील सोन्याच्या बाली कानात दिसत नव्हत्या कानातील सोन्याच्या बालीसाठी ओमचा निर्घुण हत्या केल्याचे चर्चा गावभर होती. नेमका हाच धागा पकडत पोलीसानी शेजारच्या अल्पवयीन २ संशयिताना ताब्यात घेतल्या नंतर गुन्हयाची उकल झाली. 


आरोपी हा अल्पवयीन असुन उस्मानाबाद येथील महाविदयालयात इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेतोय या गुन्हयात इतर आरोपी सहभागी आहेत का ? याचा तपास पोलीस करत असुन पोलीस अधिक्षक निवा जैन पोलीस उप अधिक्षक डाँ सई भोरे पाटील पोलीस निरिक्षक अजिनाथ काशिद यांनी काही तासात गुन्हयाची उकल करुन आरोपीला ताब्यात घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या