उस्मानाबाद रिपोर्टर
पुढील ३० वर्ष उस्मानाबादला लागणाऱ्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उजनी धरणातून ५० एमएलडी पाणी योजना २०२४ पर्यंत कार्यान्वित होईल अशी माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
१४ डिसेंबरला उस्मानाबाद नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये पटलावर आलेल्या विषयासंदर्भात खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन मंजूर करण्यात आले. उस्मानाबाद शहराला पिण्याचा पाणीपुरवठा प्रश्न मिटविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती सभागृहाला अध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली.
२०१३ नंतर उस्मानाबादला अनेक वेळा दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागला. शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी २०२१ च्या जनगणनेनुसार उस्मानाबादला २६ एमएलडी पाण्याची गरज गरज होती. त्यानुसार तेरणा आणि रुईभर धरणातून ५ आणि उर्वरित १६ एमएलडी पाणी उजनी धरणातून घेण्याचे नियोजन होते. आज पासून म्हणजे २०५४ पर्यंत पुढील ३० वर्षाच्या काळात शहरातला लागणाऱ्या पाण्याची गरज लक्षात घेऊन ५० एमएलडी पाणी पूर्णपणे उजनी धरणातून उचलण्याचे नियोजन आहे. उजनी धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी उचलल्यानंतर तेरणा आणि रुईभर धरणातील पाणी हक्क सोडला जाणार आहे. याकरिता आवश्यक असणारा अंदाजपत्रकीय अहवाल लवकरच तांत्रिक आणि अन्य प्रशासकीय मान्यतासाठी पाठवला जात आहे. आज सर्वसाधारण सभेमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन या कामासाठी सर्वांनी सहमती मंजुरी असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.
0 टिप्पण्या