बावी शालेय समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड



बावी रिपोर्टर 


वाशी तालुक्यातील बावी येथे जि प प्रा शाळेच्या वतीने शालेय समिती च्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली.अध्यक्षपदी मनीषा  अनिल धावारे तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


यावेळी 226 विद्यार्थ्यां च्या पालकांना सूचना माहिती पत्र देऊन ‌‌  मुख्याध्यापक ‌घुले शिक्षक माने सर्व शिक्षक स्टाफ च्या वतीने सरपंच संजय शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जि.प.प्रा शाळा बावी येथे शालेय शिक्षण समिती नव्याने गटित करण्यात आली.यावेळी समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्षासह सदस्य मनीषा शिंदे,दादा कवडे,उद्धव शिंदे,भांगे,देशमुख,काका, राऊत,सुतार यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी पालकांची मोठया संख्येने उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या