संस्कृती जतन करत पुढील पिढीमध्ये ती रुजविणे महत्त्वाचे - लक्ष्मीकांत जाधव


          


उस्मानाबाद रिपोर्टर 


 सध्याच्या डिजीटल युगामध्ये माणूस आपल्या संस्कृतीला विसरत असून जुन्या पिढीने आपली संस्कृती पुढील पिढीमध्ये रुजविण्याचे महत्त्वाचे काम करणे गरजेचे आहे. असे मत उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीकांत जाधव यांनी व्यक्त केले.

           एकता फाउंडेशन उस्मानाबाद व संतकृपा बहुउद्देशीय सामाजिक संस्था वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने वसुबारस निमित्त वाघोली येथे आयोजित दोन दिवसीय गो महिमा कीर्तन व गोपुष्टी यज्ञ समारोपाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती उपसभापती प्रदीप शिंदे, एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, माजी उपसभापती ओमप्रकाश मगर, उपसरपंच नितीन चव्हाण, सतीश खडके, मुकुंद पाटील, तलाठी अमोल निरफळ, प्रदीप पाटील, एकता फाउंडेशनचे कार्याध्यक्ष विशाल थोरात, ह.भ.प. आकाश मगर, ह.भ.प.मधुसुदन पाटील, शिवलिंग गुळवे, प्रसाद देशमुख आदींची उपस्थिती होती.

           वाघोलीत अनेक चांगले उपक्रम होत असून अशा उपक्रमासाठी एकता फाउंडेशन व गणेश मंडळ सदैव सोबत राहील अशी ग्वाही एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी दिली.

            गेल्या दोन वर्षापासून एकता परिवार व वाघोलीकर यांच्या सहकार्यातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम होत असून असे उपक्रम समस्त जिल्ह्याभरात व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत गोमाता पूजन व यज्ञ अशा उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडत असल्यामुळे अशा गोष्टीतून संस्कृती जतन केली जात आहे असे मत आभिलाष लोमटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

           कार्यक्रमाची सुरुवात गोमाता पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दीपक साखरे यांनी केले यावेळी ह.भ.प बाबुराव जाधव व कृष्नाथ शेळके या व्यक्तींना संत गोराकुंभार वारकरी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ह.भ.प.नवनाथ जाधव चिखलीकर व ह.भ.प. ज्ञानेश्वर काकडे आळंदीकर यांची किर्तन सेवा संपन्न झाली.            

           कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश पिंपळे, दत्ताञेय मगर, गोपाळ साखरे, दीपक साखरे, प्रशांत मगर, बालाजी पाटील, औदुत सुतार, बालाजी साखरे व वैष्णव विचार धाराचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या