श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजचे नीट मध्ये उल्लेखनीय यश ‌:सहा विदयार्थी एमबीबीएसला पात्र


उस्मानाबाद रिपोर्टर 

 12 सप्टेंबर २०२१ रोजी NTA घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालामध्ये श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.सहा विदयार्थी 512 पेक्षा अधिक गुण घेवून उत्तीर्ण झाले असुन या विद्यार्थ्यांना एमबीबीएसला निश्चितपणे प्रवेश मिळेल.आशी माहिती आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये आदर्श शिक्षण प्रसार​क मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली.

कॉलेजने सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे हे यश मिळाले आहे अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन आणि नियमितपणे घेतलेल्या परीक्षा रात्र अभ्यासिका दत्तक पालक योजना गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन नेट व जेईई साठी दिल्ली कोठा हैदराबाद येथील PCMB साठी विशेष प्राध्यापक यामुळे कॉलेजमध्ये 512 पेक्षा अधिक गुण मिळविणारे एकूण सहा विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांनां एमबीबीएसला निश्चितपणे प्रवेश मिळेल व 300 पेक्षा अधिक गुण असणारे 20 विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना बीडीएस व बीएएमएस प्रवेश मिळू शकेल. श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयात मागील सात वर्षांपासून फोटोन बॅच मध्ये नीट जेईई साठी विशेष तयारी करून घेतली जाते या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी दिल्ली कोटा व हैदराबाद या ठिकाणाहून PCMB चे प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या अभिप्राय नुसार नियुक्त केले आहेत त्यामुळेच मागील दोन वर्षापासून येथील विद्यार्थी नीट व जेईई  परीक्षेमध्ये यश मिळवत आहेत NTA ने जाहीर केलेल्या निकालानुसार आमच्या येथील श्री अमर युवराज उंबरे 575 कुमारी अंकिता बालाजी कुंभार 548 शिंदे पंकज बाळासाहेब 538 कुमारी प्रतिभा सुनील यादव 530 कुमारी साक्षी सुनील पवार 517 कुमारी प्रतीक्षा पद्माकर लोमटे 512 हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना निश्चितपणे एमबीबीएसला प्रवेश मिळू शकेल हे यश आमच्या फोटाॅन बॅच मध्ये सकाळी आठ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सातत्याने केलेले अध्यापन सराव परीक्षा रात्र अभ्यासिका व योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश आम्हाला मिळू शकले विशेष म्हणजे यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याने खाजगी शिकवणी क्लास लावलेला नव्हता उल्लेखनीय बाब म्हणजे हे सर्व विद्यार्थी सामान्य कुटुंबातील व सर्वसाधारण होते यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष  सुधीर पाटील प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील प्राचार्य देशमुख एस.एस.उपप्राचार्य घा‌र्गे एस के पर्यवेक्षक हाजगुडे टी पी विभाग प्रमुख कला व वाणिज्य नन्नवरे एन आर फोटाॅन बॅच प्रमुख भगत ए व्ही व सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या