ब्रिजलाल मोदानी सह 11 जनांवर खंडपीठात याचीका दाखल : 9 नोव्हेबर ला होणार सुनावणी: संचालकांच्या नामनिर्देशनपत्रा वर आक्षेप: येत्या निवडणुकीत ठराविकांची मक्तेदारी होणार हाद्दपार

 उस्मानाबाद रिपोर्टर 


रिझर्व बॅंकेची परवानगी न घेता चेअरमन मोदानीसह संचालकांनी 2005,2006 सली काटोल ब्रिज कंपनी या आर्थिक तोट्यातील कंपनीचे दहा कोटी रुपयांचे सहभाग शेअर्स खरेदी केले. या व्यवहारात बँकेचे पाच कोटी 46 लाख रुपये नुकसान झाले असुन विदयमान चेअरमन सह 11 जनांनी ही रक्कम अदयाप बॅंकेत जमा केली नाही.यामुळे सुधीर पाटील यांनी नामनिर्देशनपत्रा वर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.


उस्मानाबाद जनता सहकारी मल्टीस्टेट बँकेच्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवार बँकेचे विद्यमान चेअरमन ब्रिजलाल यांच्यासह विद्यमान आकरा संचालकांच्या नामनिर्देशनपत्रा वर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.याचिकेत म्हटल्यानुसार बँकेच्या निवडणुकीतील उमेदवार मोजणी आणि अकरा संचालकांनी 2005 2006 सली काटोल ब्रिज कंपनी या आर्थिक तोट्यातील कंपनीचे दहा कोटी रुपयांचे सहभाग शेअर्स खरेदी केले होते समभाग खरेदी करण्यापूर्वी बँकेने रिझर्व बँकेची परवानगी घेतली नाही या व्यवहारात बँकेचे पाच कोटी 46 लाख रुपये नुकसान झाले होते म्हणून केंद्रीय निबंधकांनी सदरील रक्कम तत्कालीन संचालकांकडून दर महीना  वसूल करण्याचे आदेश 28 एप्रिल 2008 रोजी दिले होते. मात्र संबंधितांनी आत्तापर्यंत ही रक्कम भरली नाही. परिणामी ते 12 उमेदवार मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी कायदा 2002 नुसार अपात्र आहेत. असा आक्षेप याचिकाकर्त्यांनी नामनिर्देशन पत्राचा छाननीच्या वेळी घेतला होता. मात्र निवडणूक अधिकारी यांनी संबंधितांची नामनिर्देशनपत्रे मंजूर केली म्हणून पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने सुट्टीतील न्यायमूर्ती आर्यन लढ्ढा यांनी मंगळवारी प्रतिवादी विद्यमान अध्यक्ष 11 संचालकांना बँकेला आणि निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या