उस्मानाबाद रिपोर्टर
येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेंतर्गत स्व. प्रमोदजी महाजन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव अॅड.मिलिंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.प्रशांत चौधरी ,वैद्यकीय अधिकारी डॉ.शकील अहमद खान,राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.मकरंद चौधरी यांची उपस्थिती होती.
या शिबिरात जवळपास 36 विद्यार्थ्यांनी तर १० पालक व परिसरातील नागरिकांनी कोरोना लसीचा डोस घेतला. या लसीकरणासाठी श्री .बाळासाहेब काकडे,श्री .शिंदे श्री .सुहास चव्हाण,श्रीमती मुंडे ,शेटे ,नीता डुकरे ,शोभा शिंदे ,शबाना शेख ,हे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचारी व प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले .
0 टिप्पण्या